वाघोली पोलीस स्टेशनचे मोठे यश: पो.हवा. प्रदीप मोटे यांच्या फिर्यादीवरून बेकायदेशीर शस्त्र बाळगणारा तडीपार तानाजी जाधव जेरबंद!


पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई: पो.हवा. प्रदीप मोटे यांच्या तत्परतेमुळे तडीपार आरोपी पिस्तुल व जिवंत काडतुसांसह जेरबंद!!

पुणे (प्रतिनिधी):

पुणे शहरातील गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या आदेशानुसार, वाघोली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने एक मोठी आणि धडाकेबाज कामगिरी केली आहे. पोलीस हवालदार प्रदीप मोटे यांच्या सतर्कतेमुळे एका तडीपार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, त्याच्याकडून पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

कारवाईचा सविस्तर वृत्त:

दिनांक ०७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २:४५ वाजताच्या सुमारास वाघोली पोलीस स्टेशनचे तपास पथक केसनंद गावठाण परिसरात गस्त घालत होते. या दरम्यान पोलीस हवालदार प्रदीप मोटे (बॅज क्र. ६६१६) यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे एका तडीपार आरोपीस ताब्यात घेण्यात आले.

पो.हवा. प्रदीप मोटे यांच्या तक्रारीवरून वाघोली पोलीस स्टेशनमध्ये आरोपी तानाजी अर्जुन जाधव (वय २६ वर्ष, रा. लाडबा वस्ती, केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय हत्यार कायदा व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त:

अटक करण्यात आलेल्या आरोपी तानाजी जाधव याच्याकडून ४१,००० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघु करत आहेत.

पोलीस पथकाची कामगिरी:

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त अमिनाश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनिता मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती पल्लवी मेहेर आणि मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईमध्ये पोलीस हवालदार प्रदीप मोटे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघु, सपोफौ बाळासाहेब मोराळे, पोलीस शिपाई विशाल गायकवाड, पांडुरंग माने, मारुती वाघमारे, अशोक शेळके, महादेव कुंभार, ऋषीकेश व्यवहारे, भोरडे, शिंदे, घावटे आणि गोरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिकाबजावली


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!