कवी आणि पुरस्कारार्थींच्या अनुभवांतून समाज अन् भाषा समृद्ध होते : विनोद अष्टुळ


*

 

*हडपसर, – विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आपले संपूर्ण जीवन तन-मन-धनाने समाजाच्या हितासाठी खर्च करत असतात, तसेच समाजाचा विवेकवादी आरसा दाखवण्याचे कार्य साहित्यिक, कवी आपल्या साहित्यातून करत असतात. अशा सामाजिक भान असणाऱ्या असामान्य व्यक्तींचे अनुभव उपस्थितांनी आवर्जून ऐकले पाहिजेत. केवळ आपली कविता सादर करून किंवा पुरस्कार घेऊन निघून जाऊ नये, या सर्वांकडे समाज आणि भाषा समृद्ध करणारे तसेच प्रेरणा देणारे महान अनुभव असतात, असे परखड मत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, साहित्य सम्राटचे संस्थापक साहित्यिक *विनोद अष्टुळ* यांनी व्यक्त केले.

 

अश्वमेध पब्लिकेशन हाऊस आणि अश्वमेध आय.ए.एस. अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक प्रकाशन, कवी संमेलन, नवदुर्गा सन्मान आणि काव्यरत्न सन्मान सोहळ्याचे आयोजन रामानंद कॉम्प्लेक्स, हडपसर येथे करण्यात आले होते.

यावेळी पुढे मंचावरील मान्यवर आणि सन्मानार्थी यांनी आपापली थोडक्यात मनोगते व्यक्त केली.

 

या सोहळ्याच्या मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक अशोक मोहिते, प्रमुख अतिथी साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टुळ, सत्यशोधक रघुनाथ ढोक, संस्थापिका अध्यक्ष डॉ. अश्विनी काळे, सुप्रसिद्ध निवेदक संदीप रासकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात लेखिका ॲनेशा मुजुमदार लिखित *’द अनसोल्व्ड केसेस’* या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशनाने झाली. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना *’नवदुर्गा पुरस्कार’* देऊन तर साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना *’काव्यरत्न पुरस्कारा’ने* मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

सन्मान सोहळ्यानंतर झालेल्या बहारदार कवी संमेलनात सिद्धार्थ कुलकर्णी, रूपचंद शिरोई, अशोक मोहिते, रघुनाथ ढोक, अनिता क्षीरसागर, संगीता वानखेडे, डॉ. दिनेश खैरे, साक्षी माने, भरत माने, सुनिता वाघचौरे, निधी पालकर, श्रीकांत ढोबळे, चंद्रकांत चाबुकस्वार, डॉ. मनोज लडकत, जितेंद्र नगरकर, शांताराम भादवणकर, अनिता भोसले, श्रीराम साळवे, संदीप रासकर आणि विनोद अष्टुळ यांनी आपल्या काव्यरचना सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

 

संपूर्ण कार्यक्रमाचे सदाबहार सूत्रसंचालन संदीप रासकर यांनी केले, तर आभार आयोजिका डॉ. अश्विनी काळे यांनी मानले.


16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!