महावितरणचे अधिकारी आणखी किती बळींची वाट पाहताहेत?”; साडेसतरानळीतील जीवघेण्या घटनेनंतर अमोल नाना तुपेंचा तीव्र संताप.


*महावितरणचे अधिकारी सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी खेळत आहेत का? महावितरणच्या सुस्त कारभाराला जाग कधी येणार? – अमोल नाना तुपे*

 

साडेसतरानळी येथील दांगट वस्तीमध्ये आज महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे एक अत्यंत थरारक आणि जीवघेणी घटना घडली. सुदैवाने आज मोठा अनर्थ टळला. *महावितरणचे अधिकारी आणखी किती मोठ्या अपघाताची किंवा बळींची वाट पाहत आहेत*? *महावितरणच्या सुस्त कारभाराला जाग कधी येणार? “महावितरणचे अधिकारी सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी खेळत आहेत का?” असा संतप्त आणि थेट सवाल क्रांती शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी प्रशासनाला विचारला आहे*.

 

नागरिकांना या गलथान कारभारामुळे रोज जीव मुठीत धरून जगावे लागत असून, प्रचंड मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 

⚡ *अमोल नाना तुपे यांनी दिला ‘क्रांती’ इशारा*:

* साडेसतरानळी भागातील सर्व विद्युत पोलचे तातडीने निरीक्षण करून ठोस उपाययोजना करा!

* या भागातील वीज वाहिन्यांचे तातडीने अंडरग्राउंड केबलिंग करण्यात यावे!

 

 

जर येत्या दोन दिवसांत यावर महावितरणने ठोस पावले उचलली नाहीत, तर क्रांती शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन महावितरण प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडणार आहेत!

 

 

“भविष्यात येथे कोणतीही जीवितहानी किंवा अपघात झाल्यास, त्याला सर्वस्वी महावितरण जबाबदार असेल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील!”

— अमोल नाना तुपे


16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!