“पुण्यात रिक्षात ज्येष्ठांना लुटणारी सराईत टोळी गजाआड; समर्थ पोलिसांकडून १५ लाखांचे दागिने जप्त!”


“समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कारवाई..! रिक्षा प्रवासात वयोवृध्दांच्या सोनसाखळया शिताफीने चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून १५ लाख रुपये किमतीचे दागिने केले हस्तगत”

पुणे:

रिक्षा प्रवासादरम्यान वयोवृद्ध नागरिकांना लक्ष करून हातचालाखीने सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून १५ लाख रुपये किमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्र. १७५/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५)) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक १४/०६/२०२६ रोजी सकाळी ११:३० ते ११:४० च्या सुमारास तक्रारदार ज्येष्ठ नागरिक महिला पॉवर हाऊस चौक ते भवानी पेठ असा ऑटोरिक्षाने प्रवास करत असताना, रिक्षातील ४ अनोळखी इसमांनी संगणमत करून त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी (चेन) शिताफीने लांबवली होती.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने चक्रे फिरवली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर आरोपी हे जळगाव येथील असून ते एकट्या-दुकट्या वयोवृद्ध प्रवाशांना गाठून चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले.

तपास पथकाने तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी शाकीर जाकीर तेली (वय २९ वर्ष, रा. संतोष नगर, कात्रज, पुणे) याला दि. ०१/०७/२०२६ रोजी अटक केली. त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीनंतर त्याच्या इतर साथीदारांची नावे समोर आली:

मोसीन खान नुर खान (वय ३१ वर्षे, रा. गेंदालाल मील, जळगाव)

इस्माईल उर्फ राजु शब्बीर शेख (वय ५० वर्षे, रा. एकता हॉलच्या मागे, जळगाव)

गणेश उर्फ मेमरी (रा. जळगाव – फरार आरोपी)

उर्वरित आरोपी पुन्हा असाच गुन्हा करण्याच्या तयारीत असताना मालधक्का चौक, पुणे येथे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्यांना दि. ०२/०९/२०२६ रोजी रात्री अटक करण्यात आली.

 

अटक आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पुणे शहर हद्दीतील सिंहगड रोड, काळे पडळ, वानवडी, बंडगार्डन तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून सुमारे १५,००,०००/- रुपये किमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार (बॅच क्र. १००३) शेख करत आहेत.

 

सदरची यशस्वी कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर), मा. श्री. संजय दराडे (पोलीस सह आयुक्त), मा. श्री. राजेश बनसोडे (अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग), मा. श्री. कृषिकेश रावले (पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०१), मा. श्री. सचिन हिरे (सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. जयंत राजुरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), श्री. चेतन मोरे (पोलीस निरीक्षक – गुन्हे), तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री. संदीप पाटील, सपोफौ/पगार, पो.हवा. रोहिदास वाघेरे, पो.हवा. इम्रान शेख, पोहवा/औचरे, पोहवा/शिवा कांबळे, पोहवा/अमोल गावडे, मपोहवा/गंगावणे, पोशि/अविनाश दरवडे, पोशि/चौधारे व पो.शि./यादव यांनी केली आहे.


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!