अमोल नाना तुपे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मनपाचे डोळे उघडले; बड्या बिल्डरचे अतिक्रमण निष्कासित!!


अमोल नाना तुपे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर धनाढ्य बिल्डरवर मनपाची कारवाई!

‘गरिबांना लाथ अन् श्रीमंतांना साथ’ देणाऱ्या मनपा प्रशासनाला ‘क्रांती शेतकरी संघाचा’ थेट दणका

हडपसर (विशेष प्रतिनिधी):

पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने हडपसर परिसरात नुकतीच केलेली कारवाई अत्यंत अन्यायकारक आणि पक्षपाती स्वरूपाची होती. या दुजाभावाविरोधात ‘क्रांती शेतकरी संघा’चे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत थेट जाब विचारला. त्यांच्या या दणक्यामुळे अखेर झोपलेल्या मनपा प्रशासनाला जाग आली असून राजकीय पाठबळ असलेल्या एका धनाढ्य बिल्डरच्या बेकायदेशीर लेबर कॅम्पवर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

“तोंड पाहून कारवाई करतंय का?” – अमोल नाना तुपे यांचा घणाघात

हडपसरमधील कारवाईदरम्यान मनपा प्रशासनाकडून गरिबांवर त्वरित कारवाई केली जात होती, तर दुसरीकडे बड्या आणि श्रीमंत बिल्डर्सच्या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. या दुटप्पी धोरणावर अमोल नाना तुपे यांनी अतिशय आक्रमक भाषेत प्रशासनाला धारेवर धरले:

“मनपा अतिक्रमण विभाग ‘तोंड पाहून’ कारवाई करतंय का?”

“प्रशासन एकाला पोटाशी आणि दुसऱ्याला पाठीशी का घालतंय?”

“गरिबांसाठी एक आणि श्रीमंतांसाठी दुसरा कायदा का?”

त्यांच्या या घनघनाटी प्रश्नांमुळे मनपा अधिकारी आणि प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली.

आक्रमक भूमिकेचा मोठा विजय

क्रांती शेतकरी संघाच्या या आक्रमक आंदोलनामुळे आणि अमोल नाना तुपे यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे महापालिका प्रशासनाला माघार घ्यावी लागली. राजकीय पाठबळ असलेल्या धनाढ्य बिल्डरने उभारलेला बेकायदेशीर लेबर कॅम्प मनपा अतिक्रमण विभागाने पूर्णपणे हटवायला लावला.

या धडक कारवाईमुळे हडपसर परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून, “सामान्यांच्या हक्कासाठी धावून जाणारे नेतृत्व” म्हणून क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांचे कौतुक होत आहे.


16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!