अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

मांजरी : “शिक्षकांनी घडविलेला विद्यार्थी हा समाजाची खरी संपत्ती असतो. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणे ही शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे.”असे करिअर मार्गदर्शक व्याख्याते डॉ.महेंद्र शिंदे यांनी सांगितले.

मांजरी बुद्रुक येथील के.के.घुले विद्यालयात अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था व वैजयंती बेल्हेकर ग्रंथालय व वाचनालय यांच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे बोलत होते यावेळी संस्था अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर, पांडुरंग घुले,बाबासाहेब शिंगोटे, दिलीप घुले,दिपक घुले, पृथ्वीराज शिंदे व्यापीठावर उपस्थित होते यावेळी डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते रविंद्र निगडे,वैशाली मोहिते,डॉ. अश्विनी शेवाळे,राजेंद्रकुमार गदादे,अश्विनी बनकर,भगवान बेल्हेकर,मिलिंद कोबल,करुणा कंद,रमेश लोखंडे,किरण उगलमुगले, दत्तात्रय कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच प्रकाश रासकर,उषा राऊत यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.मानपत्र व फुलाचे रोपटे असे पुरस्काराचे स्वरूप होते.

शिंदे पुढे म्हणाले आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक आणि विश्वासू व्यक्ती म्हणून संवाद साधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली सोनावळे यांनी केले तर बाबा शेलार वंदना काजळे यांनी संयोजन केले.

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!