उद्या दिसणार हडपसरमध्ये खड्ड्यांचा प्रताप पडद्यावर दिसणार; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन परिवर्तन पॅंथर आक्रमक!!


रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात रिपब्लिकन परिवर्तन पॅंथर आक्रमक; ४ सप्टेंबरला ‘खड्डे बुजाओ, आदमी बचाओ’ आंदोलन

हडपसर (पुणे):

हडपसर-मुंढवा क्षेत्रातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पुणे महानगरपालिकेकडून रस्त्यांच्या दुरुस्तीवर खर्च होऊनही अनेक ठिकाणी खड्डे वेळेत बुजवले जात नाहीत. प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन परिवर्तन पॅंथर संघटनेच्या वतीने ४ सप्टेंबर २०२६ रोजी शांततामय मार्गाने अनोखे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

या संदर्भात संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष गजेंद्र (बाबा) प्रकाश मोरे यांनी हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आणि हडपसर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे पूर्वसूचना दिली आहे.

आंदोलनाची वैशिष्ट्ये व तपशील:

आंदोलनाचे नाव: “खड्डे बुजाओ, आदमी बचाओ”

आंदोलनाचा प्रकार: स्क्रीन लावून “खड्डे प्रदर्शन आंदोलन”

दिनांक व वेळ: ४ सप्टेंबर २०२६ | सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत

ठिकाण: हडपसर-मुंडवा क्षेत्रीय कार्यालयासमोर, पुणे

स्क्रीनवर दाखवणार खड्ड्यांचे दृश्य:

या आंदोलनादरम्यान परिसरातील खड्ड्यांची छायाचित्रे व चित्रीकरण (व्हिडिओ) स्क्रीनवर दाखवून नागरिक व प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून मार्ग सुरक्षित व खड्डेमुक्त करावेत, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. हे आंदोलन शांततामय व लोकशाही मार्गाने होणार असून कायदा व सुव्यवस्थेचे पालन केले जाईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!