कारमधून ५० लाख रुपये लांबवणाऱ्या दोघांना अवघ्या ८ तासांत बेड्या; पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई
पिंपरी-चिंचवड:
कारचे बनावट चावीने लॉक उघडून आत ठेवलेली ५० लाख रुपयांची रोकड चोरून फरार झालेल्या दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलिसांनी अवघ्या ८ तासांच्या आत अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली ५० लाख रुपयांची संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे.
दिनांक ०९/१०/२०२६ रोजी रात्री १०:५० ते रात्री १२:१५ वा. दरम्यान संदिप हॉटेल पुनावळे समोरील सिमेंटच्या सर्व्हिस रोडवर पार्किंग केलेल्या कारचे बनावट चावीने दरवाज्याचे लॉक खोलून कारमध्ये ठेवलेले ५० लाख रुपये चोरी करून नेल्याने रावेत पोलीस ठाणे, गु.र.नंबर- ४७६/२०२६ बी.एन.एस कलम- ३०५(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. पोलीस आयुक्त साहेब, पिंपरी चिंचवड, श्री. विनय कुमार चौबे साहेब, यांनी सर्व गुन्हे शाखा आणि रावेत पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.
त्यानुसार अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आव्हाड साहेब, आम्ही स्वतः, पोउआ परिमंडळ-०२, श्री प्रदिप जाधव, सप。「 गुन्हे-१, सुदर्शन राठोड, सप।、「, वाकड विभाग, सुनिल कुम्हाडे यांनी गुन्हे शाखा, युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलीस ठाणे यांची पथके तयार करून मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याचा आदेश दिले होते.
त्यानंतर सदर पथकांनी घटनास्थळास भेट देऊन सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली असता एका इसमाने कार जवळ येऊन बनावट चावीने गाडी खोलून ५० लाख रुपये असलेली बॅग घेऊन गेल्याचे सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये दिसत होते. त्या अनुषंगाने अधिक तपास केला असता फिर्यादी बरोबर मुंबई येथे पैसे आणण्यासाठी गेलेल्या दोन इसमांपैकी संशयित इसम नामे चारुदत्त बेंडाळे यास ताब्यात घेऊन त्याचे कडे गुन्ह्याचे अनुषंगाने कौशल्य पूर्ण तपास केला असता त्याने कारची बनावट चावी त्याचा मित्र नामे प्रसाद बनकर यास देऊन कार मध्ये ५० लाख रुपये असले बाबत माहिती देऊन सदर रक्कम चोरी करण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
त्यानंतर आरोपी नामे आरोपी नामे प्रसाद शिवाजी बनकर, वय-२९ वर्षे, धंदा-सुपरवायझर, रा-मु.पो.चिंचबली, ता-खेड, जि-पुणे यास चिंचबली येथून ताब्यात घेऊन त्याचे कडून व आरोपी नामे चारुदत्त शिवाजी बेंडाळे, वय-३० वर्षे, धंदा- बांधकाम व्यवसाय, रा-मु.पो.निघोजे, बेंडाळे वस्ती, ता-खेड, जि-पुणे यांचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेले ५० लाख रुपये हस्तगत करण्यात आले असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे साहेब, सह पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. शशिकांत महावरकर
अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आव्हाड साहेब, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. श्री. रोहिदास पवार, पोउआ परिमंडळ-०२, श्री प्रदिप जाधव, सप。「, गुन्हे-१ मा. श्री. सुदर्शन राठोड, सप。「, वाकड विभाग, सुनिल कुम्हाडे यांचे मार्गदर्शनखालील गुन्हे शाखा, युनिट-२ चे वपोनि संदिप सावंत, मालमत्ता विरोधी पथकाचे वपोनि संजय चव्हाण, रावेत पोलीस ठाण्याचे वपोनि रुषिकेश घाडगे, पोउपनि मयुरेश साळुंखे, पोउपनि राहुल खिल्लळे, पोहवा/ विक्रम कुदळ, कृष्णा शितोळे, गोविंद चव्हाण, आशिष बोटके, पोशि/गणेश सावंत, विनोड विर, शामसुंदर गुट्टे आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोशि/रमेश कारके यांनी केली आहे.









