मा.लोक नियुक्त सरपंच मा.चित्तरंजन नाना गायकवाड यांच्या वाढदिवशी सामाजिक बांधिलकी; ३ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी तर १,५०० जणांना NCMC कार्डचे वाटप!!


मा. लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन नाना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व आरोग्य उपक्रम;

 

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे मा.लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन नाना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त ६ ऑक्टोबर रोजी विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या मा. उपसरपंच तथा विद्यमान सदस्य राजश्रीताई काळभोर तसेच उदय भाऊ काळभोर यांच्या माध्यमातून या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी नागरिकांसाठी NCMC कार्ड नोंदणी व वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये NCMC कार्ड काढलेल्या तब्बल १ हजार ५०० नागरिकांना कार्डचे वाटप करण्यात आले.

 

तसेच विश्वराज हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. त्याचबरोबर गॅलेक्सी आय हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या विविध आरोग्य उपक्रमांमध्ये तब्बल ३ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

 

वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आल्याने नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

 

या कार्यक्रमास चित्तरंजन नाना गायकवाड,प्रशांत दादा काळभोर, नासिर खान पठाण, अनिल टिळेकर, अविनाश पप्पू बडदे, अभिजित पप्पू बडदे, बिना काळभोर, सिमिता लोंढे, सुरेश काळभोर, निलेश काळभोर, सतिष काळभोर, नितीन लोखंडे, शिवाजी काळभोर, जयप्रकाश कदम, समीर खान, रमजान तांबोळी, दीपक काळभोर, राणीताई बडदे, ॲड. राहुल झेंडे, सुहास काळभोर, शाहीर खुळपे, सुशील काळभोर, विशाल गुजर, नितीन टिळेकर, शब्बीर पठाण, विजय खेडेकर, अरुण बापू काळभोर, सुभाष नाना काळभोर, सुभाष आप्पा काळभोर, गुरुदेव आबा काळभोर, ऋत्विक काळभोर, सागर काळभोर, केशव तात्या काळभोर, राजू आबा काळभोर, प्रवीण काळभोर, बळवंत काका काळभोर, भास्कर तात्या काळभोर, रवीशेठ काळभोर, माऊली काळभोर, रमेश भोसले, आप्पासाहेब काळभोर, संदीप पवार, गुलाब चौधरी, संजय भोटडे, सागर कांचन, संदीप गोते, रामदास चौधरी, आकाश काळभोर तसेच ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!