विश्रामबाग : पुणे पोलीस दलाची धडक कारवाई; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी जाळ्यात!!


विश्रामबाग पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १० लाखांच्या १४ चोरीच्या दुचाकी जप्त, दोघांना घेतले ताब्यात  !!

पुणे (प्रतिनिधी):

पुणे शहर आणि परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका विधीसंघर्षीत बालकासह लातूर येथील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण १० लाख रुपये किंमतीच्या १४ चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

नवीन पेठ भागातील चिमणबाग सोसायटीसमोरून २३ जून २०२६ रोजी एक होंडा शाईन गाडी (MH 37 AB 3872) चोरीला गेली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान नारायण पेठ भागात दोन संशयित तरुण आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता, एका संशयिताने अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला, तर दुसऱ्या विधीसंघर्षीत बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने पुणे शहर, जिल्हा व इतर ठिकाणांहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच चोरीच्या गाड्या अहमदपूर (जि. लातूर) येथील कृष्णा चंद्रकांत शेळके (वय २६) याला विकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने लातूर येथे जाऊन कृष्णा शेळके यालाही अटक केली.

 

या कारवाईमुळे पुणे शहर आणि इतर जिल्ह्यातील एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.

विश्रामबाग पोलीस ठाणे: ०२ गुन्हे

पुणे व पिंपरी-चिंचवड (समर्थ, हडपसर, भारती विद्यापीठ, विमानतळ, काळेवाडी ठाणे): ०५ गुन्हे

इतर जिल्हे: ०५ गुन्हे

तसेच इतर २ वाहनांच्या मालकांचा शोध सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री. संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग श्री. राजेश बनसोडे, परिमंडळ ०१ चे पोलीस उप-आयुक्त श्री. कृषीकेश रावले, विश्रामबाग विभागाच्या सहा. पोलीस आयुक्त श्रीमती अनुजा देशमाने, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्री. विकास भिंगारदिवे व श्री. रमेश लाहिगुडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड, पोलीस उपनिरीक्षक मेहबुब मोकाशी, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, अमोल भोसले, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशीकांत दरेकर, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जुन थोरात, भास्कर गायकवाड, उमेश गव्हाणे यांनी केलेली आहे.

 


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!