पुणे (प्रतिनिधी): शनिवार वाडा Lal Mahal परिसरात वाहतूक नियम भंगाच्या कारवाईदरम्यान मोठा गोंधळ समोर आला आहे. सिग्नल तोडणाऱ्या वाहनाचा नंबर एक असताना, दंडाची पावती (चलन) मात्र दुसऱ्याच वाहन
धारकाच्या नावावर पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिग्नल तोडणाऱ्या वाहनाचा नंबर MH 12 YM 9457 असा असताना, चुकून चलन MH 12 VM 9457 या वाहनावर पाठवण्यात आले. संबंधित वाहन हे जुपिटर (दुचाकी) असल्याचे समोर आले आहे. या चुकीमुळे निष्पाप वाहनधारकाला 500 रुपयांचा दंड भरावा लागण्याची वेळ आली.
या प्रकरणात वाहतूक विभागातील महिला कर्मचारी Suvarna Walke यांच्याकडून ही चूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. “टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात अशा चुका होत आहेत का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, चुकीचे चलन रद्द करून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच, अशा चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी वाहतूक विभागाने अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली . यांच्या टारगेट मुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो.
Mh12YM9457या गाडी नियम मोडला









