हडपसर (प्रतिनिधी): हडपसर येथील Serum Institute of India परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे एक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
घटनेनंतर तब्बल काही तास उलटूनही झाड हटवण्यात आले नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘क्रांती शेतकरी संघटने’चे संस्थापक अध्यक्ष व जनसेवक अमोल नाना यशवंत तुपे यांनी तातडीने पुढाकार घेतला.
त्यांनी स्वतः जेसीबीची व्यवस्था करून रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केले. यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत झाली असून, वाहनचालकांनी समाधान व्यक्त करत अमोल नाना तुपे यांचे आभार मानले.
या कामात संघटनेचे पदाधिकारी पांडुरंग तुपे, विनोद पवार, संदीप चव्हाण, चेतन सावंत, ओमकार लांडगे आणि राजेश धांदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मा .
रवी खंदारे यांचेही विशेष सहकार्य मिळाले.
स्थानिकांकडून या तत्पर कारवाईचे क्रांती शेतकरी संघटनेचे स्वागत करण्यात येत असून, प्रशासनानेही अशा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.









