मुलीने वडिलांना दिली किडनी; राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांना नवजीवन,!!!!


पुणे (प्रतिनिधी): राज्याचे मा .राज्यमंत्री Vijay Bapu Shivtare यांना त्यांच्या स्वतःच्या मुलीने किडनी दान करून एक हृदयस्पर्शी आदर्श निर्माण केला आहे. गेली सुमारे पाच,सहा  वर्षे डायलेसिसवर जीवन जगत असलेल्या शिवतारे यांच्यावर अखेर मुंबईतील नामवंती हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.

ही किडनी त्यांची मुलगी Dr Mamata Shivtare यांनी दान केली. वडिलांसाठी स्वतःची किडनी देत त्यांनी “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा” या संदेशाला खऱ्या अर्थाने जिवंत उदाहरण दिले आहे.

डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, सध्या विजय बापू शिवतारे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला असून, मुलींच्या योगदानाची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

या प्रसंगानंतर विविध स्तरांतून शिवतारे कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, “मुलगी वाचवा” या संदेशाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!