व्यवसाय कर भरून सुद्धा अतिक्रमण कारवाईचा फटका; हातगाड्या जप्त, गोरगरिब व्यवसायिकांवर अन्याय ? जागा सुद्धा उपलब्ध करून देत नाही ?


हडपसर-मुंढवा अतिक्रमण कारवाई वादात; पथारीवाल्यांचा सवाल – “आम्ही व्यवसाय करायचा कुठे?”

पुणे (महेश टिळेकर)हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सध्या जोरदार चर्चेत आली आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या पानटपऱ्या तसेच पंडित नेहरू मार्केट यार्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. काही व्यावसायिकांनी मार्केट परिसरात अनधिकृतरित्या जागा व्यापल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

याच परिसरात पुढे गेल्यावर काही दुकानदारांनी ये-जा करण्याचा रस्ता पूर्णपणे अडवलेला असल्याचे चित्र दिसते. मंत्री मार्केट, गाडीतळा पुलाखालील भागातही हातगाडीवाल्यांनी फुटपाथ आणि रस्ते अडवले असून, सासवड मार्ग ते सोलापूर मार्ग या भागातही हीच परिस्थिती कायम आहे.

पालिकेने सर्वेक्षण करून काही पथारीवाल्यांना व्यवसाय परवाने दिले असले, तरी त्यांना अद्याप स्थिर व अधिकृत जागा उपलब्ध करून दिलेली नाही. रवी दर्शन परिसरातही अनेक पथारी व्यवसाय सुरू असून, जागेअभावी हे व्यावसायिक रस्त्यावरच व्यवसाय करत आहेत.

व्यवसाय कर भरुन सुद्धा परिस्थिती आहे तशीच ? पथारीवाल्यांचा प्रश्न असा आहे की, “पालिका जागा देत नाही, आणि रस्त्यावर बसलो तर अतिक्रमण विभाग कारवाई करून आमच्या हातगाड्या जप्त करतो. मग आम्ही जगायचं कसं?” या कारवाईमुळे गोरगरिबांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पथारीवाल्यांना हक्काची व कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक व व्यावसायिकांकडून जोर धरत आहे.


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!