✨ अखेर उपोषणाला यश; कदमवाकवस्ती मधील ६७ बाधित नागरिकांना DBT द्वारे नुकसान भरपाई मिळणार ✨


उपोषणाच्या लढ्याला यश; कदमवाकवस्तीतील ६७ बाधित नागरिकांना मिळणार थेट नुकसान भरपाई…

लोणी काळभोर : मौजे कदमवाकवस्ती येथील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या हक्कासाठी सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश मिळाले असून, तहसील प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत बाधितांना दिलासा दिला आहे.

कदमवाकवस्ती परिसरातील नागरिकांच्या नुकसानीबाबत उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्या राजश्री उदय काळभोर यांनी १३ एप्रिल २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत अपर तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, लोणी काळभोर कार्यालयाने तातडीने कार्यवाही करत नुकसान भरपाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे पाठविला आहे.

तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ६७ बाधित नागरिकांची यादी सादर करण्यात येणार असून, संबंधितांना शासनाच्या नियमानुसार थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे त्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे. याबाबत प्रशासनाने लेखी हमी दिल्यामुळे उपोषणकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, तहसील प्रशासनाने उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर मा . उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ.राजश्री उदय काळभोरयांनी आपले उपोषण मागे घेतले. “आजचा हा विजय सामान्य नागरिकांच्या एकजुटीचा विजय आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच हा लढा यशस्वी झाला,” असे सांगत त्यांनी पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

या निर्णयामुळे कदमवाकवस्तीतील बाधित नागरिकांना लवकरच आर्थिक मदत मिळणार असून, त्यांच्या समस्यांना न्याय मिळाल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!