पुणे मार्केटयार्ड पोलिस स्टेशन ची धडाकेबाज कारवाई; चोरीचे ५ मोबाईल जप्त, दोन विधीसंघर्षित बालक ताब्यात!


पुणे, दि. २२ जून : मार्केटयार्ड परिसरातून चोरीस गेलेला मोबाईल विक्रीसाठी आणलेल्या दोन विधिसंघर्षित बालकांना मार्केटयार्ड पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत मोबाईल जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दोन संशयित अल्पवयीन मुलं चोरीचा मोबाईल विकण्यासाठी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली.

तपासादरम्यान संबंधित विधिसंघर्षित बालकांकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचा  विवो ,ओपो.सॅमसंग,रेडमी कंपनीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत हा मोबाईल मार्केटयार्ड परिसरातून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुनीता नलवडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील मापकर, राजेश थोरात, दत्तात्रय राजत, कौस्तुभ जाधव, महेश जाधव तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!