पुण्यात काळेपडळ येथे जमिनीच्या वादातून वृद्ध नागरिकावर हल्ला; परराज्यातील गुंडांच्या साहाय्याने हत्येची थेट धमकी!


३० ते ४० कोयतेधारी गुंडांचा वावर | जेसीबीने अतिक्रमाचा प्रयत्न | पोलिसांच्या निष्क्रीयतेवर तक्रारदाराचा तीव्र संताप व प्रशासनाला थेट इशारा! 

पुणे (विशेष बातमीदार):

काळेपडळ, हडपसर येथील कचरा डेपो शेजारी राहणारे नागरिक श्री. बाळासाहेब वैजनाथ धीरे यांच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शेजारी राहणाऱ्या जयस्वाल कुटुंबाने परराज्यातील भयानक गुंडांच्या मदतीने दहशत माजवली आहे. वृद्ध वडिलांवर जीवघेणा हल्ला करून उघडपणे पिस्तुलने गोळी मारून मर्डर करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब धीरे यांची काळेपडळ येथे पडीक जमीन असून तेथे ते शेड उभारणार आहेत. मात्र, या हक्काच्या जमिनीवर शेजारी राहणारे आरोपी अजित जयस्वाल, सुजित जयस्वाल व त्यांच्या वडिलांची वाईट नजर आहे. ही मोकळी जागा बळकावून तेथे बेकायदेशीर धंदे सुरू करण्याचा त्यांचा कट आहे. यातूनच आरोपींनी बेकायदेशीरपणे जेसीबी (JCB) आणून जमिनीवर अतिक्रमाचा प्रयत्न केला.

वृद्ध वडिलांवर हल्ला व पिस्तूल मारण्याच्या धमक्या!

तक्रारदार बाळासाहेब धीरे यांचे वृद्ध वडील श्री. वैजनाथ धीरे यांनी अतिक्रमाला विरोध केला असता, आरोपी जयस्वाल यांनी त्यांच्यावर मोठे दगड उचलून मारण्याचा प्रयत्न केला व “तुला दगडाने मारून टाकीन” अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर, उत्तर प्रदेश आणि बिहार येथील घातक प्रवृत्तीच्या व्यावसायिक गुंडांना (मोबाईल क्र. ७७९८८८११२३ आणि ९९७५०३७०७७) बोलावून थेट ‘पिस्तुलने गोळी झाडून मर्डर करण्याची’ भाषा वापरली जात आहे.

सध्या या परिसरात ३० ते ४० अनोळखी तरुण हातात उघडे कोयते आणि लोखंडी रॉड घेऊन दहशत निर्माण करत आहेत. त्यांनी धीरे कुटुंबाची पूर्ण रेकी (माहिती) काढली असून, रस्त्यात, कामावर किंवा घरात घुसून कधीही जीवघेणा हल्ला करण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे बाहेरील गुंड मर्डर करून मूळ राज्यात पळून गेल्यास त्यांना पकडणे पोलिसांना कठीण होईल, असे गांभीर्य अर्जदाराने व्यक्त केले आहे.

पोलीस प्रशासनाकडे अत्यंत कडक मागण्या व अंतिम इशारा:

१. विशेष पोलीस रणनीती (Police Strategy): काळेपडळ पोलिसांनी तात्काळ विशेष रणनीती आखून आरोपींवर गुन्हा दाखल करावा व त्यांना तात्काळ ताब्यात घ्यावे.

२. आयुक्तांना अहवाल: हा सर्व गंभीर प्रकार तात्काळ मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्याकडे वर्ग करण्यात यावा.

३. न्यायालयाला माहिती: आरोपींचा गुन्हेगारी इतिहास आणि मर्डरच्या धमक्यांचा प्रकार कोर्टाच्या निदर्शनास आणावा.

४. २४ तास कडक गस्त (Day & Night Patrolling): पुढील १५ दिवस सतत दिवसातून २-३ वेळा आणि विशेषतः रात्री ११:०० वाजता पोलीस व्हॅनने घराभोवती गस्त घालावी.

५. ७ दिवसांत लेखी खुलासा: पोलिसांच्या कारवाईचा ‘Written Action Taken Report’ ७ दिवसांच्या आत अर्जदाराला मिळावा.

६. तातडीची पोलीस व्हॅन (ALERT Mode): पुन्हा हल्ला किंवा अतिक्रमण झाल्यास कॉल येताच ५ मिनिटांत पोलीस व्हॅन घटनास्थळी पाठवावी.

अर्जदार बाळासाहेब धीरे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, हा प्रशासनाला शेवटचा इशारा आहे. वेळोवेळी तक्रारी देऊनही ढिसाळ कारभारामुळे आरोपी मोकाट आहेत. जर माझ्या किंवा कुटुंबातील कोणाचाही मर्डर झाला किंवा जीवितहानी झाली, तर काळेपडळ पोलीस स्टेशनचे अधिकारी याला सर्वस्वी जबाबदार राहतील. या तक्रारीची प्रत मानवाधिकार आयोगालाही पाठवण्यात आली आहे.


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!