हडपसर (पुणे):
काळेपडळ, कचरा डेपो शेजारी राहणाऱ्या बाळासाहेब वैनाथ धिरे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला शेजारी राहणारे अजित जयस्वाल, सुजित जयस्वाल आणि त्यांच्या वडिलांकडून गेल्या अनेक दिवसांपासून विनाकारण मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अर्जदार बाळासाहेब धिरे यांनी पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५, वानवडी) तसेच काळेपडळ पोलीस स्टेशन येथे अंतिम तक्रार अर्ज सादर करून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास आरोपींनी धिरे यांच्या घराच्या जागेत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यांनी बाळासाहेब धिरे व त्यांच्या कुटुंबाला अत्यंत हीन दर्जाची शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, घरातील महिला व मुलींशी अत्यंत अरेरावीची, अश्लील आणि विनयभंग करणारी भाषा वापरून त्यांचा मानसिक छळ केला.
बेकायदेशीर दारू व्यवसाय आणि जीवे मारण्याची धमकी:
तक्रारीनुसार, सदर आरोपी हे बेकायदेशीर दारू व्यवसायात गुंतलेले असून, पैशाच्या बळावर ते “तुम्हाला जीवे मारून टाकू” अशी गंभीर धमकी सतत देत आहेत. या त्रासामुळे व महिलांच्या असुरक्षिततेमुळे धिरे कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली जगत आहे. यापूर्वी देखील काळेपडळ पोलीस ठाण्यात यासंदर्भात वेळोवेळी निवेदने व तक्रारी देण्यात आल्या होत्या. मात्र, पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई न झाल्यामुळे आरोपींचे मनोबल वाढले आहे.
तक्रारीतील मुख्य मुद्दे:
तक्रारदार (अर्जदार): श्री. बाळासाहेब वैनाथ धिरे (मो. ९७६४९२५०१३)
सामनेवाले (आरोपी): १) अजित जयस्वाल, २) सुजित जयस्वाल, ३) त्यांचे वडील (रा. काळेपडळ, हडपसर, पुणे)
आरोपींवर तात्काळ कठोर कायदेशीर पावले उचलून दलित
धिरे कुटुंबाच्या जीविताला असलेले धोके दूर करावेत आणि त्यांना संरक्षण मिळवून द्यावे.









