पुणे, दि. २२ जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कै. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त हडपसर-मुंढवा प्रभाग समिती हॉल येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाने अधिकृत मान्यता दिलेल्या अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे पुणे महानगरपालिका शाळा, महाविद्यालये, पोलीस दल तसेच विविध शासकीय कार्यालयांना वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या जनहितवादी कार्याचा, विकासाभिमुख निर्णयक्षमतेचा आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा गौरव केला. त्यांच्या विचारांचा व जनसेवेच्या वारशाचा पुढील पिढ्यांनी आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त करण्यात आले.
हडपसर चे लाडके आमदार चेतन दादा तुपे पाटील
उपाध्यक्ष सुरेश घुले, नगरसेवक निवृत्ती आप्पा बांदल, माजी नगरसेवक फारुख इनामदार, माजी नगरसेवक सुनील बनकर, विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त कृष्णाल धुमाळ, सहाय्यक प्राथमिक शिक्षण अधिकारी महादेव जाधव, महिला कार्याध्यक्ष रोहिणी क्षीरसागर, बिना कटीर्णी, सुवर्णा गोरे, स्नेहल कसबे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे आणि कार्याध्यक्ष अमर (आबा) तुपे यांनी केले. उपस्थितांनी कै. अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा समाजात कायम जपण्याचा संकल्प व्यक्त केला.









