लोकशाहीचा आवाज दाबू नका’ – पुण्यात संविधान रक्षक वकील फोरमचे निदर्शने


सोमन वांगचुक यांच्या समर्थनार्थ पुण्यात वकिलांचे आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी..

 

पुणे, दि. २०.०७.२०२६ : संविधान रक्षक वकील फोरम, पुणे यांच्या वतीने आज शिवाजीनगर न्यायालय परिसरात सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणवादी सोमन वांगचुक यांच्या समर्थनार्थ तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.

 

या आंदोलनामध्ये शंभरहून अधिक वकिलांनी सहभाग घेतला असून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या सोमन वांगचुक यांना कोणतीही चर्चा अथवा संवाद न साधता ताब्यात घेण्यात आल्याचा निषेध आंदोलकांनी व्यक्त केला. लोकशाहीमध्ये मतभिन्नता व्यक्त करण्याचा आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत व घटनात्मक अधिकार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

 

*यावेळी अॅड. तोसिफ शेख यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “सोमन वांगचुक यांना कोणतीही चर्चा न करता पांढऱ्या कपड्यातील पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले, ही घटना भारतीय लोकशाही आणि संविधानावर झालेला गंभीर आघात आहे. सरकारने केवळ एका व्यक्तीला ताब्यात घेतलेले नसून लोकशाहीच्या गळ्याला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. पांढरे कपडे हे लोकशाहीच्या कफनाचे प्रतीक बनले असून संविधानिक मूल्यांची हत्या करण्याचा हा प्रकार आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.”*

 

ते पुढे म्हणाले की, “देशातील जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न यापुढे सहन केला जाणार नाही. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी हे आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येईल. आम्ही घराघरांत जाऊन जनजागृती करू आणि लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी जनआंदोलन उभारू.”

 

संविधान रक्षक वकील फोरमच्या वतीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

 

या आंदोलनात अॅड. मोहन वडेकर, अॅड. शाहीद अख्तर, अॅड. तोसिफ शेख यांच्यासह अनेक वकील व संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संविधान रक्षक वकील फोरम, पुणे


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!