“आम्ही हफ्ते देतो…” उरुळी कांचनमध्ये अवैद्य धंदे, मटका व्यावसायिकांचे धक्कादायक दावे; कारवाईबाबत प्रश्नचिन्ह!!!!


“आम्ही हफ्ते देतो, कोणी काही करू शकत नाही”; उरुळी कांचनमध्ये मटका अवैध धंदे जुगाराबाबत गंभीर आरोप!!!!

उरुळी कांचन परिसरात खुलेआम सुरू असलेल्या मटका जुगार प्रकरणात आता अधिक गंभीर आरोप समोर येत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही मटका व्यावसायिक बिनधास्तपणे “आम्ही हफ्ते देतो, त्यामुळे पोलीसही काही कारवाई करू शकत नाहीत,” असे खुलेआम सांगत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

सी.पी.अमितेश कुमार यांच्या आदेशानंतरही बाजार मैदान, राम मंदिर परिसर व ग्रामपंचायत रोड परिसरात मटका बुकी सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे युवक वर्ग बिघडत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांनी संबंधित पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून मटका जुगार अवैध धंदे पूर्णपणे बंद करावा, अशी मागणी केली आहे.

आता उरुळी कांचन पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस अधिकारी या गंभीर आरोपांची दखल घेऊन प्रत्यक्ष तपास करतील का, आणि उरुळी कांचन परिसरातील मटका जुगारावर आळा बसेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!