मुख्यमंत्री कार्यालयाकडून टेंभुर्णी पोलिसांच्या चौकशीचे आदेश; नॅशनल रिपब्लिकन पार्टीचा ला आले यश.!!!!
पुणे/सोलापूर:
टेंभुर्णी पोलीस स्टेशनमधील कथित गैरप्रकारांबाबत नॅशनल रिपब्लिकन पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून, या प्रकरणाची दखल आता थेट मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवांनी सोलापूर जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
नॅशनल रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आर. बी. जगताप यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. अजित मोरे, गणेश नाळे आणि कल्याण पाटील यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने या तिन्ही अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, केवळ चौकशीच्या आदेशावर समाधान न मानता, या प्रकरणाचा तार्किक अंत व्हावा आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी नॅशनल रिपब्लिकन पार्टीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या १५ एप्रिल २०२६ रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर पक्षाच्या वतीने बेमुदत उपोषण आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
“प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले असले तरी, जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. १५ एप्रिलला पुण्यात होणारे आंदोलन हे अन्यायाविरुद्धचा एल्गार असेल.”
— आर. बी. जगताप (प्रदेशाध्यक्ष, नॅशनल रिपब्लिकन पार्टी)
या आंदोलनामुळे आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशामुळे सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या राजकीय व पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर
चौकशी प्रमुख व्यक्ती: पी.एस.आय. अजित मोरे,इतर दोन गणेश नाळे, कल्याण पाटील.









