संडे बाजार परिसरात पिस्टल घेऊन फिरणारा डिलिव्हरी बॉय अटकेत; कोंढवा तपास पथकाची कामगिरी!!


देशी बनावटीच्या पिस्टलसह सराईत गुन्हेगार कोंढवा पोलिसांच्या जाळ्यात; ५०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोंढवा (पुणे):

कोंढवा परिसरात देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने रंगेहात पकडून जेरबंद केले आहे. ही कारवाई १८ सप्टेंबर २०२६ रोजी साईबाबानगर, कोंढवा खुर्द येथे करण्यात आली.

अमन जमील खान (वय २७, धंदा: डिलिव्हरी बॉय, रा. सुप्रीम लिम्रा सोसायटी, इनामनगर, कोंढवा खुर्द, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

कोंढवा पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण आणि केशव हिरवे यांना बातमीदाराकडून गुप्त माहिती मिळाली. साईबाबानगर येथील संडे बाजार परिसरातील अव्वाल द फर्स्ट कलेक्शनच्या भिंतीजवळ एक इसम बेकायदेशीरपणे पिस्टल आणि काडतूस घेऊन थांबल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलीस उप-निरीक्षक रवींद्र गावडे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन छापा टाकला. तेथे संशयितरित्या थांबलेल्या अमन खान याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून ५०,००० रुपये किमतीचे काळ्या रंगाचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल आणि ५०० रुपयांचे एक जिवंत काडतूस असा एकूण ५०,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

 

पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे की, हे देशी बनावटीचे पिस्टल आरोपीने त्याचा साथीदार वसीम शकील खान उर्फ ‘वस्सू’ (रा. भाग्योदयनगर, मक्का मशिदीजवळ, कोंढवा खुर्द) याच्याकडून आणले होते.

या प्रकरणी पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७२६/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला आणि फरार आरोपी दोघेही पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष मासाळ करत आहेत.

 

ही कामगिरी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (पूर्व प्रादेशिक विभाग), पोलीस उप-आयुक्त राजलक्ष्मी शिवणकर (परिमंडळ ५), सहाय्यक पोलीस आयुक्त रामदास इंगवले (वानवडी विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष चौधरी व प्रशांत मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक रवींद्र गावडे, सागर पवार, अमोल हिरवे, रवींद्र चिप्पा, कानिफनाथ कारखेले, केशव हिरवे, राहुल रासगे, अमित सूर्यवंशी, रियाज पटेल, रवी जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, संतोष बनसुडे, सूरज शुक्ला, प्रशांत खाडे, रशीद शेख, शाहिद राजपूत, राहुल शेलार आणि ओंकार शेटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!