
अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती अभियान फेरी काढण्यात आली
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती. जनजागृती फेरी; विद्यार्थीनी घेतली निर्व्यसनी राहण्याची शपथ !!!!
हडपसर (प्रतिनिधी): उच्चशिक्षित युवापिढी व्यसनांच्या आहारी जाऊन आपले आयुष्य उध्वस्त करीत असल्याची खंत व्यक्त करत, या पिढीला वाचवण्यासाठी व्यापक व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबविण्याची गरज असल्याचे मत अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी व्यक्त केले.
साडेसतरा नळी येथे शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था व ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी परिसरात जनजागृती फेरी काढण्यात आली.
शाळेचे संस्थापक रतन माळी, मुख्याध्यापिका स्मिता वाघ, दिलवरसिंग पावरा, दिपाली कांबळे, कल्पना कोल्हे, ओजस बेल्हेकर, सुशीला मगर, आशा पाटील, अर्चना गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचे संदेश देणारे फलक हातात घेत परिसरात जनजागृती केली. शिवकालीन पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी नृत्य, लेझीम व भाषणकला कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
बेल्हेकर पुढे म्हणाले, “शिवजयंतीचे औचित्य साधून सर्व युवापिढीने एकत्र येत आयुष्यभर निर्व्यसनी राहण्याची शपथ घेतली, तर तीच खरी शिवरायांना मानवंदना ठरेल









