अनोल नाना तुपे यांची सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देण्याची भूमिका
हडपसर :
दरवर्षीप्रमाणे यंदाही साडे सतरा नळी, अमनोरा येथील फार्महाऊस मध्ये शिवजयंती साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आदरणीय अजित पवार यांच्या दुःखद प्रसंगामुळे यावर्षी कोणताही जल्लोष न करता साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय क्रांती शेतकरी संघटना अध्यक्ष अमोल नाना तुपे यांस कडून घेण्यात आला आहे.
या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत गरजू व गोरगरीब बांधवांना वैद्यकीय साहित्य (मेडिकल किट) वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजक अमोल नाना तुपे यांनी दिली.
सामाजिक जाणिवेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवजयंती उत्सवातून समाजोपयोगी संदेश देण्याचा प्रयत्न यावर्षी करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.









