3️⃣ दिवे-गराडे परिसरात भाजपचा झेंडा उंचावतोय दिव्या ताई जगदाळे यांना सर्व स्तरातून पाठिंबा!!!


दिवे-गराडे परिसरात दिव्या ताई जगदाळे (शेडकर) यांना वाढता पाठिंबा

ज्येष्ठांचा आशीर्वाद, वाड्या-वस्त्यांतील जनता ठामपणे पाठीशी !!!!

दिवे-गराडे जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार दिव्या गंगाराम जगदाळे (शेडकर) यांना दिवसेंदिवस वाढता जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः दिवे-गराडे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद तसेच वाड्या-वस्त्यांतील सामान्य जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा दिव्या ताई जगताप यांच्या पाठीशी उभा राहत आहे.

दिव्या ताई जगदाळे यांनी प्रचारादरम्यान गावोगावी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला असून, महिलांपासून युवकांपर्यंत, शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे. स्वच्छ, पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

वाड्या-वस्त्यांमध्ये होत असलेल्या प्रचार फेऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळत असून, “निरंतर विकासाचा, संकल्प विजयाचा” या घोषवाक्याला जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी दिव्या ताई जगताप यांना विजयासाठी शुभेच्छा देत आशीर्वाद दिले.

याचबरोबर गराडे पंचायत समिती गणासाठी भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. कटके ललिता दिलीप यांनाही नागरिकांचा भक्कम पाठिंबा मिळत असून, भाजपच्या विकासनामाावर मतदारांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.

येणाऱ्या निवडणुकीत कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार दिवे-गराडे परिसरातील जनतेने व्यक्त केला आहे.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!