लोककल्याण अर्पण योजना व साधना गौरव पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडला.


लोककल्याण अर्पण योजना अंतर्गत ११ वी लाभार्थी; लोककल्याण साधना गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

पुणे :

लोककल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “लोककल्याण अर्पण योजना” अंतर्गत ११ व्या लाभार्थी म्हणून श्रीमती रूपाली रविंद्र बोराटके (नागरगाव, फुरसुंगी, पुणे) यांना आर्थिक मदतीचा धनादेश व किराणा वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम संत निळोबाराय महाराजांचे ७ वे वंशज दामोदर महाराज मकशीकर यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना “लोककल्याण साधना गौरव पुरस्कार – २०२६” प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले, कार्याध्यक्ष हरीशचंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष दिलीप भामे, खजिनदार पांडुरंग शिंदे, कार्यकारिणी सदस्य तुळसाराम घोडके, चंद्रकांत वाघमारे, राजू सावळगी, अ‍ॅड. राम भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

लोककल्याण अर्पण योजनेच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना आर्थिक पाठबळ देत समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!