नंदिनी ड्रीम्स सोसायटीचा वर्षानुवर्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी; महापालिकेकडून अधिकृत कनेक्शन
पुणे :
पुणे–सोलापूर रोडवरील नंदिनी ड्रीम्स सोसायटी येथील नागरिकांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला असून, पुणे महानगर पालिकेमार्फत अधिकृत पाणी कनेक्शन जोडण्यात आले आहे.
या सोसायटीतील रहिवाशांना आतापर्यंत अनियमित व अपुऱ्या पाणी पुरवठ्याला सामोरे जावे लागत होते. मात्र या समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा करत विशाल दादा ढोरे यांनी पुढाकार घेतला. महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अखेर अधिकृत पाणी कनेक्शन मंजूर करून प्रत्यक्ष जोडणी करण्यात आली.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने नंदिनी ड्रीम्स सोसायटीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, रहिवाशांनी विशाल दादा ढोरे आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. हा प्रश्न सुटल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आह









