पुणे महापालिकेची सहकार नगर भागात धडक कारवाई; रस्ते आणि पदपथ केले अतिक्रमणमुक्त!


अनधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई!!!!

 

दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शिंदे हायस्कूल ते सहकार नगर २ (गोवळकर गुरुजी पथ) परिसरातील रस्ते व पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात आली.

 

सहकार नगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करणे तसेच शालेय विद्यार्थी, नागरिक, पादचारी आणि वाहनधारकांसाठी रस्ते व पदपथ मोकळे करण्याच्या उद्देशाने ही व्यापक कारवाई करण्यात आली.

 

या कारवाईदरम्यान वाहतुकीस अडथळा ठरणारे २० शेड, ३ स्टॉल, ७ काउंटर, ३ हातगाड्या तसेच इतर अनधिकृत साहित्य जप्त करण्यात आले. दुकानांसमोर तसेच रस्त्याच्या जागेत आणि पदपथांवर उभारण्यात आलेले लोखंडी व प्लास्टिकचे अनधिकृत शेड्स जेसीबीच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले.

 

कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि बिगारी सेवकांची मदत घेण्यात आली.

 

या कारवाईमुळे शिंदे हायस्कूल ते गोवळकर गुरुजी पथ हा रस्ता तसेच पदपथ नागरिक व पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्यात आले आहेत.

 

सार्वजनिक रस्ते व पदपथांवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढेही नियमितपणे व सातत्याने कारवाई करण्यात येणार आहे.

 

 


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!