पुणे मनपाचा इशारा: अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; १३ शाळांची यादी जाहीर
पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील पालकांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात काही शाळा अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले असून, त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मनपाने स्पष्ट केले आहे की, संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे पालकांनी दक्ष राहून अधिकृत व मान्यताप्राप्त शाळांमध्येच प्रवेश घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.
📋 अनधिकृत शाळांची यादी (एकूण १३):
न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, बिबवेवाडी
महात्मा गांधी प्रशाला, येरवडा
टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अँड मत्कब, कोंढवा
सेंट व्हु इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा
इमॅन्युएल पब्लिक स्कूल, हडपसर
आकांक्षा अकॅडमी स्कूल, लोहगाव
एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन आयर्न पब्लिक स्कूल, नन्हे
लेगसी हाय स्कूल, कोंढवा
शिबली नोमानी इंग्लिश मीडियम स्कूल, कोंढवा
ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल, उंड्री
ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल, कोंढवा
ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, आंबेगाव
आयर्न वर्ल्ड स्कूल, उंड्री
⚠️ मनपाचे आवाहन
पालिकेने पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही शाळा निवडताना तिची मान्यता तपासूनच निर्णय घ्यावा, असे सांगितले आहे.
या संदर्भातील अधिक माहितीकरिता पालकांनी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.









