खामगाव-सहजपूर परिसरात तोतया रिक्षाचालकांचे थैमान; महिला व विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात – लखन लोंढे


तोतया रिक्षा चालकांनवरती कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करु :लखन लोंढे

 

यवत पोलिस स्टेशन हद्दीमध्ये खामगाव -कासुर्डीफाटा सहजपुर टायफाटा पुणे -सोलापुर रोडवरती लायसन्स बॅच नसलेल्या तोतया रिक्षा चालकांनी अक्षरशा थैमान घातले आहे कायदेशीर मार्गाने व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे

या भागामध्ये रिक्षा व्यवसाय करणारे रिक्षा चालक हे लायसन्स बॅच परवाना धारक आहेत

पण तोतया रिक्षा चालकांकडुन त्यांचा व्यवसाय हिरावला जात आहे सरकारने मुक्त परवाना केल्यामुळे रिक्षा चालकांना प्रवासी मिळत नसल्यामुळे रिक्षा व्यवसाय हा अक्षरशा मोडकळीस आला आहे

यात अनखीन भर म्हणजे लायसन्स, बॅच नसलेल्या तोतया रिक्षा चालकांनी धुमाकुळ घातला असुन कायदेशीर मार्गाने व्यवसाय करण्यार्या रिक्षा चालकांचा प्रपंच अक्षरशा उघड्यावरती पडण्याची वेळ आली आहे

तसेच प्रवाशांकडुन ज्यादा पैसै आकारणे पैसे न दिल्यास आरेरावी भाषेमध्ये बोलुन शिवीगाळ करणे

दारु पिऊन व रिक्षा मध्ये टेपलाऊन डांग डींग करणे असे प्रकार घडत आहेत

या भागामध्ये शाळेतील मुल मुली तसेच नोकरीस जाणारा महिला वर्ग मोठ्या प्रमानात आहेत जर अशा तोतया रिक्षा चालकांकडुन काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे

 

का पोलिस प्रशासन एखादी घटना घडण्याची वाट पाहत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे

महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे राज्याचे संघटक सचिव,लखन लोंढे यांनी कारवाईची मागणी केली असुन कारवाई न केल्यास महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हणले आहेत

या प्रसंगी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पदाधिकारी पवन कोळपे महाराष्ट्र रिक्षा पंचायत हवेली तालुका अध्यक्ष गोपी अवचारे, हवेली सहसचिव अविनाश उपाध्ये, हवेली कार्याध्यक्ष संतोष खराडे, हवेली संघटक अभिजीत खलसे, तसेच शिवशाही रिक्षा संघटनेचे सचिव सचिन अवचारे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे किसण मदने, अनिल नागने, अगबर शेख,राजु मोगल नवनाथ गायकवाड उपस्थित होते


16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!