मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गांजा फेकून अवैध धंद्यांविरोधात निषेध!!!!


धक्कादायक प्रकार! मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गांजा फेकून निषेध !!!!

पुणे (प्रतिनिधी) – मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांच्या टेबलावर गांजा फेकून अवैध धंद्याचा निषेध नोंदवला आहे.

वादळ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शुभम जगताप यांनी हा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांच्या टेबलावर गांजा टाकत पोलिसांच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड पोलीस हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शुभम जगताप यांनी स्वतः कारवाई करत हा प्रकार उघडकीस आणल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेदरम्यान त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत, “वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नाही, त्यामुळे आम्हाला हा मार्ग अवलंबावा लागला,” असे म्हटले.

या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नागरिकांमध्येही या घटनेबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर संबंधित अवैध धंद्यांवर कारवाई होणार का, आणि पोलिस प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!