दलित पॅंथर संघटनेत नवीन नियुक्ती; बोपोडी शाखा व पुणे शहर कार्याध्यक्षपदी आशुतोष येरेल्लू यांची निवड!!
पुणे:
दलित पॅंथर संघटनेच्या संघटन विस्तारांतर्गत पुणे शहरातील सामाजिक व आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते पँथर आशुतोष रविंद्र येरेल्लू यांची दलित पॅंथरच्या पुणे शहर कार्याध्यक्ष आणि जुना मुंबई-पुणे रोड, बोपोडी शाखा प्रमुख पदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. यशवंतभाऊ नडगम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, जुना मुंबई–पुणे रोड, गोपीचाळ, बोपोडी येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात या नव्या शाखेचे उद्घाटन आणि पदभार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी नवनिर्वाचित शहर कार्याध्यक्ष आशुतोष येरेल्लू यांनी संघटना व वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. “माझ्यावर टाकलेली ही जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेन. ही नवी शाखा केवळ एक कार्यालय नसून, परिसरातील वंचित, पीडित घटकांच्या हक्कांसाठी लढा देण्याचे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे प्रमुख केंद्र बनेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.












