हडपसर विषारी दारू प्रकरण: निष्काळजीपणाचा ठपका ठेवत तीन पोलीस अधिकारी निलंबित; १२ जणांचा गेला होता जीव!


हडपसर विषारी दारू प्रकरण: पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची धडक कारवाई; तीन पोलीस अधिकारी निलंबित

पुणे:-

हडपसर परिसरातील पांढरे मळा येथे विषारी दारू पिऊन झालेल्या मृत्यूप्रकरणानंतर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचा आणि कर्तव्यात कमालीचा हलगर्जीपणा दाखवल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी तीन पोलीस अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार निलंबित झालेले अधिकारी:

१. संजय मोगले – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे.

२. हसीना शिकलगार – प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस चौकी.

३. हसन मुलाणी – पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शोध पथक.                                                                          नेमके काय आहे प्रकरण?

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पांढरे मळा परिसरात गावठी अथवा विषारी दारू पिल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या विषारी दारूमुळे तब्बल १२ जणांनी आपला प्राण गमावला आहे. या गंभीर प्रकरणानंतर हडपसर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका; पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, हडपसर परिसरात अवैध दारू विक्री होत असल्याबाबतची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आधीपासूनच होती. असे असूनही या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यात आणि त्यावर प्रभावी कारवाई करण्यात हे अधिकारी पूर्णपणे अपयशी ठरले. या निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचे नाहक बळी गेले, ज्यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला आणि विश्वासार्हतेला मोठा धक्का बसल्याचे आदेशात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्तांच्या या थेट आणि धडक कारवाईमुळे हद्दीतील अवैध धंद्यांकडे डोळेझाक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अवैध व्यवसायांना पाठबळ देणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराच या कारवाईच्या माध्यमातून देण्यात आला आहे.


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!