लोणी काळभोरमध्ये अल्पवयीन चालकाची दहशत; १७ वाहनांना धडक


📍 “लोणी काळभोरमध्ये अल्पवयीन चालकाने १७ वाहनांना धडक; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही”

लोणी काळभोर परिसरात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात चारचाकी चालवत तब्बल १७ दुचाकी व इतर वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास पोलिस ठाण्यासमोर घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार ही नवनाथ सातव यांच्या मालकीची असून त्यांनी आपल्या नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यासाठी दिली होती. हा मुलगा मित्रांसह दर्शनासाठी गेला होता व परतताना त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात वाहनमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!