कर्तव्य बजावताना वाहतूक पोलीस नाईक धनाजी वणवे यांचे हृदयविकाराने निधन; पुणे पोलिस दलात शोक
पुणे : पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलीस नाईक धनाजी भरत वणवे (वय ४२) यांचे कात्रज मंडई चौकात कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही दुर्दैवी घटना सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कर्तव्य बजावत असतानाच आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या त्यांच्या निधनामुळे पुणे पोलिस दलात शोककळा पसरली असून सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
Views: 190









