लक्झरी कारमधून गावठी दारूची तस्करी; वानवडी पोलिसांकडून दोन आरोपी अटकेत!!!!


उच्चभ्रू होंडा सिटी कारमधून ४२० लिटर गावठी दारूची वाहतूक; वानवडी पोलिसांची धडक कारवाई, दोघे जेरबंद

पुणे : होळी व धुळवडीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करत वानवडी पोलिसांनी होंडा सिटी कारमधून गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १२ प्लास्टिक कॅनमध्ये भरलेली तब्बल ४२० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे लियाकत रोहित अब्बासी (वय ३२, रा. ढोबरवाडी, सोपानबाग, घोरपडी) आणि समीर संजय राठोड (वय २३, रा. शिंदवणे काळेशिवार, ता. हवेली) अशी आहेत.

वानवडी पोलिस ठाण्याचे पथक होळीच्या पार्श्वभूमीवर परिसरात गस्त घालत असताना कारमधून गावठी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती तपास पथकातील पोलिस हवालदार दया शेगर आणि अभिजित चव्हाण यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी संशयित होंडा सिटी कारची तपासणी केली असता कारमध्ये १२ प्लास्टिक कॅनमध्ये गावठी दारू आढळून आली.

चौकशीत होळी व धुळवडीच्या पार्श्वभूमीवर दारूची मागणी वाढत असल्याने आरोपी लियाकत अब्बासी याने एका व्यक्तीच्या सांगण्यावरून समीर राठोड याच्याकडून ही दारू खरेदी केल्याची माहिती समोर आली.

ही कारवाई वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, महेश गाडवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णू सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले आणि अर्शद सय्यद यांच्या पथकाने केली.


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!