खळबळजनक: पुण्यात दीड लाखांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; एसीबीच्या पथकावरच केला हल्ला!


पुणे: चेक बाऊन्स प्रकरणातील वॉरंटची अंमलबजावणी न करण्यासाठी आणि आरोपीला मदत करण्यासाठी अडीच लाखांची लाच मागणाऱ्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. गणेश शहाजी कस्पटे (वय ४०, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे या लाचखोर हवालदाराचे नाव आहे. कारवाईदरम्यान कस्पटे याने तक्रारदाराचा चावा घेत एसीबीच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

तक्रारदाराच्या मालकावर हैदराबाद न्यायालयात चेक बाऊन्सचा खटला सुरू आहे. या प्रकरणी मालकाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट निघाले होते. हे वॉरंट बजावू नये आणि अटकेची कारवाई टाळावी, यासाठी हवालदार कस्पटे याने यापूर्वी मार्च महिन्यात तक्रारदाराकडून ५ लाख रुपये उकळले होते. मात्र, दोन महिन्यांनी पुन्हा वॉरंट आल्याचे सांगत त्याने पुन्हा अडीच लाखांची मागणी केली. तडजोडीअंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले.

एसीबीच्या जाळ्यात हवालदाराचा थरार

सततच्या पैशांच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने ५ मे रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार, ६ मे रोजी बोटक्लब रोडवरील सुलक्स कल्पतरू गार्डन्ससमोर सापळा रचण्यात आला. दीड लाखांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने कस्पटेला घेरले. मात्र, पकडले गेल्याचे लक्षात येताच त्याने तक्रारदाराच्या छातीचा चावा घेतला आणि पथकातील अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. अखेर पथकाने त्याला शिताफीने जेरबंद केले.

लाचखोर: हवालदार गणेश शहाजी कस्पटे (कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन).

लाचेची रक्कम: १ लाख ५० हजार (मागणी २.५० लाखांची)  भ्रष्टाचारासह सरकारी कामात अडथळा आणणे आणि अधिकाऱ्यांवर हल्ला करणे.

पोलीस दलातील अशा लाचखोर वृत्तीमुळे खाकी वर्दीला पुन्हा एकदा गालबोट लागले असून, एसीबीच्या या धाडसी कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!