
हडपसर–मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने घुले वस्ती ते गोपाळपट्टीपर्यंत रस्त्यावरील अतिक्रमणावर धडक कारवाई केली. सहाय्यक आयुक्त रवींद्रखंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण मार्गावर अतिक्रमण हटवण्याची मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे.
कारवाईदरम्यान रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या व टेम्पो जप्त करण्यात आले असून त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे. या कारवाईसाठी क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, स्थानिक नागरिकांनी रस्ते मोकळे झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.
भविष्यातही घुले वस्ती ते गोपाळपट्टी तसेच परिसरातील इतर भागांमध्ये अतिक्रमण आढळल्यास कडक आणि नियमित कारवाई केली जाईल, असेही सहाय्यक आयुक्त रवींद्र खंदारे यांनी स्पष्ट केले आहे.
Views: 159









