औंध-बाणेर सहआयुक्तालयाचा भ्रष्ट कारभार,दलित वृद्ध नागरिकाच्या तक्रारीला उपभियंता लांडेकडून केराची टोपली, बांधकाम खात्यावर जबाबदारी ढकलून हात झटकले, चिखलवाडी-खडकीतील जेष्ठ दलित नागरीकावर जागा वाचवण्यासाठी आली आमरण उपोषणाची वेळ,आडनाव सारखे असल्याचा गैरफायदा घेत जीवे मारण्याची धमकी देत गुंडाने जागा बळकावली,प्रशासनाला हाताशी धरत सुरु केले अनधिकृत बांधकाम,मनपा गवणी, गावठाण,बांधकाम विभागाकडे तक्रार,उडवाउडवीची उत्तरे,मारायला लावल्या चकरा..शाम उघाडे यांचा गंभीर आरोप* औंध-बाणेर सहआयुक्तालयाचा भ्रष्ट कारभारामुळे चिखलवाडी-खडकीतील शाम देवजी उघाडे या जेष्ठ दलित नागरीकावर जागा वाचवण्यासाठी आमरण उपोषणाची वेळ आलेली आहे,आडनाव सारखे असल्याचा गैरफायदा घेत जीवे मारण्याची धमकी देत मनोज बाळकृष्ण उघाडे या गुंडाने जागा बळकावली असून औंध-बाणेर सहआयुक्तालयातील गवणी,गावठाण,बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना हाताशी धरत अनधिकृत बांधकाम सुरु केले आहे,औंध-बाणेर सहआयुक्तालयातील गवणी,गावठाण,बांधकाम विभागाकडे जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे दाखवत तक्रार करूनहि उडवाउडवीची उत्तरे मिळतात,दोन महिन्यांत या विभागातून त्या विभागात चकरा मारायला लावल्या,त्याचा गैरफायदा घेत मनोज उघाडे याने बांधकाम पूर्ण करत आणले,आपण जेष्ठ नागरिक असून आजारी असल्याचा गैरफायदा घेत बांधकामास संमती असल्याच्या पत्रावर अर्धवट शुद्धीत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सही घेतल्याचा शाम उघाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केला,बेकायदेशीर बांधकाम न पाडल्यास न्याय मिळण्यासाठी औंध-बाणेर सहआयुक्तालयासमोर कुटुंबास सोबत घेऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी शाम उघाडे यांनी दिला.या संदर्भात उपअभियंता श्री लांडे यांची पत्रकारांनी अधिक माहितीसाठी भेट घेतली असता त्यांनी सारवासारव करत उडवाउडवीची उत्तरे दिली,तर सहआयुक्त विजय नायकल यांनी सविस्तर माहिती माझ्याकडे आली नसून योग्य ती कारवाई करू असे सांगितले आहे.
न्याय न मिळाल्यास सहआयुक्तालयासमोर आमरण उपोषण
प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या शाम उघाडे यांनी प्रशासनाला जाहीर इशारा दिला आहे. जर हे बेकायदेशीर बांधकाम त्वरित पाडण्यात आले नाही आणि आपल्याला न्याय मिळाला नाही, तर आपल्या संपूर्ण कुटुंबासह औंध-बाणेर सहआयुक्तालयासमोर ‘आमरण उपोषण’ करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आता या प्रकरणावर पालिका प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
.








