पुण्याची मानसी यादव राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेती; हाँगकाँग आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!!


पुणे : लोणीकंद येथील मानसी अविनाश यादव हिने राष्ट्रीय स्तरावरील अॅथलेटिक्स स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. बंगळुरू येथे २६ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या २० वर्षांखालील राष्ट्रीय ज्युनिअर फेड अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत तिने महिलांच्या ३ हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात अव्वल स्थान मिळवले.

टूमकुर मैदान येथे झालेल्या या स्पर्धेत मानसीने ११ मिनिटे १०.५९ सेकंद अशी वेळ नोंदवत उत्तर प्रदेशच्या ऐशा वर्मा (११:१३.७९) आणि मध्य प्रदेशच्या अंशूला (११:२५.२३) यांना मागे टाकले. या प्रकारासाठी पात्रता वेळ ११ मिनिटे ३१.३५ सेकंद होती, जी मानसीने सहज पार केली.

या उत्कृष्ट कामगिरीमुळे मानसीची हाँगकाँग येथे २८ ते ३१ मेदरम्यान होणाऱ्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मानसी सध्या बीजेएस महाविद्यालय वाघोली येथे शिक्षण घेत असून ती सणस मैदानावर नियमित सराव करते. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या यमुना लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली तिने कठोर परिश्रम घेतले. तसेच कुटुंबीय व प्रशिक्षक सुधांशु खैरे यांचेही तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशामुळे मानसीने आपल्या गावाचे व राज्याचे नाव उज्ज्वल केले असून सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!