सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप; अशोक खरात आणि रूपाली चाकणकरांवर अघोरी विद्या प्रकरणात सीडीआर तपासाची मागणी!!!!!!


रूपाली चाकणकरांवर सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप;अशोक खरात आणि  रुपाली चाकणकर यांचे सीडीआर तपासाची मागणी!!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे.

सुषमा अंधारे यांनी आरोप करताना दावा केला की,अशोक खरात आणि रुपाली चाकणकर या अघोरी विद्या करत असल्याच्या चर्चा असून या संदर्भात सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच, रूपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

याशिवाय, काही अघोरी प्रथांमध्ये “अनामिका (बोट) कापणे” किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जात असल्याचा उल्लेख करत, त्या माध्यमातून काही गोष्टी आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या आरोपांवर अद्याप रूपाली चाकणकर यांची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या प्रकरणामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा उधाण आले असून, याची चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!