पुणे पोलिसांचा मोठा दणका: १.१६ कोटींचे एमडी ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; अहमदाबादपासून पुण्यापर्यंत धाडसी कारवाई!!


पुणे शहर आणि ग्रामीण भागात अमली पदार्थांचे मोठे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा वाघोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मुख्य सूत्रधारासह एकूण ८ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून ४५ लाख ६० हजार रुपये किमतीचे २२५ ग्रॅम एमडी आणि महागड्या कार असा एकूण १ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

केसनंद फाट्यावर पहिली कारवाई…..

१६ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८ च्या सुमारास जोगेश्वरी वजनकाटा, केसनंद रोड येथे वाघोली पोलिसांनी सापळा लावला होता. यावेळी पोलिसांनी १) अनिस शम्मु सय्यद (वय २८, रा. मांजरी बुद्रुक) आणि २) हरी उत्तम उफाडे (वय ३५, रा. वाघोली) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे १ लाख १० हजार रुपये किमतीचे ५.५ ग्रॅम मेफेड्रोन (MD) सापडले. तपासादरम्यान त्यांनी हे ड्रग्ज सुमित घुले (रा. मांजरी) आणि बापू होले (रा. लोणीकंद) यांच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे कबूल केले.

अहमदाबाद ते पुणे: पोलिसांचा थरार…..

पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण केले असता मुख्य सूत्रधार ३) सुमित घुले हा गुजरातमध्ये असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला अहमदाबाद येथून शिताफीने अटक केली. त्याच्या चौकशीतून या साखळीतील इतर दुवे समोर आले:

रामनिवास बिश्नोई: याला खराडी येथील थिटे नगर येथून ६३.६२ ग्रॅम एमडीसह अटक केली.

आकाश ढवळे: याला कारेगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून १५९ ग्रॅम एमडी हस्तगत केला.

विपीनकुमार पंडित: हा २०१६ च्या कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी असून जानेवारी २०२५ मध्ये जामिनावर बाहेर आला होता. तो या टोळीला ड्रग्ज बनवण्यासाठी मदत करणार होता. त्याला हडपसर भागातून अटक करण्यात आली.

 

आरोपी विपीनकुमार पंडितच्या मदतीने सुमित घुले आणि आकाश ढवळे हे पुणे ग्रामीण भागातील लोणीकंद, कोरेगाव भीमा, शिक्रापूर आणि शिरूर परिसरात ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी हे रॅकेट मोडीत काढले. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेल्या BMW, स्विफ्ट आणि ग्लान्झा यांसारख्या महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

 

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस हवालदार प्रदीप मोटे, शेखर शिंदे, विशाल गायकवाड, गहिनीनाथ बोयणे, महादेव कुंभार आणि राहुल तुपारे यांचा समावेश होता.

वाघोली पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(क), २१(ब), २१(क), २९ नुसार गुन्हा (रजि. नं. २५९/२०२६) दाखल असून पुढील तपास सुरू आहे.


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!