लोणी काळभोर: हातभट्टी दारू विक्रीवर कारवाई, तिघांना अटक; वाहनांसह मुद्देमाल जप्त!!!!


लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई; २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर (पुणे): पुणे शहर पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार, लोणी काळभोर पोलिसांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू विक्रीवर मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत पोलिसांनी एकूण २,९५,०००/- रुपयांचा ऐवज जप्त केला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गस्त घालत असताना ही कारवाई केली. सकाळी ९:१५ च्या सुमारास आलमगीर जामा मशिद कब्रस्तान जवळ असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये ही अवैध विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.

कारवाई दरम्यान पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:गावठी हातभट्टी दारू: ४५० लिटर (किंमत ४५,०००/- रुपये).चारचाकी वाहन: एक अल्टो कार (किंमत १,५०,०००/- रुपये).दुचाकी वाहने: टीव्हीएस ज्युपीटर आणि होंडा ॲक्टिव्हा मोपेड (एकूण किंमत १,००,०००/- रुपये).

या प्रकरणी पोलिसांनी मुबारक जाफर गड्डे (वय ४८ वर्षे), बानो मुबारक गड्डे (वय ४० वर्षे) आणि समीर संजय राठोड (वय २३ वर्षे) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ही विशेष कारवाई पोलीस उपायुक्त श्री. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती स्मिता पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या पथकामध्ये खालील पोलीस अंमलदारांचा समावेश होता:पोलीस हवा. १७०४ माने.पोलीस हवा. ७५१९ जगदाळे.पोलीस अं. ४५९२ दडस.पोलीस अं. २० गिरी.पोलीस अं. ५१२४ सोनवणे.म.पो.अं. २६९ पोळ

सौजन्य: रोखठोक सुरभी.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!