सह आयुक्त रवींद्र खंदारे यांच्या आदेशानंतर कामाला वेग; बाजूला जाळ्या बसवण्याचे ही काम सुरू..

आकाशवाणी आनंद नगर :
क्रांती शेतकरी संघटनाचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. परिसरातील नागरिकांकडून जुन्या बेबी कॅनलमध्ये साचलेल्या कचरा व गाळाबाबत सतत तक्रारी येत होत्या. यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर अमोल नाना तुपे यांनी विषय गांभीर्याने घेत हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय येथे पाठपुरावा केला. त्यानंतर सह आयुक्त रवींद्र खंदारे यांनी तातडीने दखल घेत संबंधित विभागाला जुन्या बेबी कॅनलमधील साचलेला कचरा व गाळ काढण्याचे आदेश दिले.
सध्या कॅनल स्वच्छतेचे काम जोमात सुरू असून कॅनलच्या बाजूला संरक्षक जाळ्या बसवण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा कचरा टाकण्यावर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
परिसरातील नागरिकांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत अमोल नाना तुपे तसेच सह आयुक्त रवींद्र खंदारे यांचे आभार मानले आहेत.









