फुरसुंगी पोलीस स्टेशन यांच्या हद्दीत तडीपार असलेला आरोपी दत्ता रामभाऊ होळकर (रा. होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये दत्ता होळकर यास पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसर व पुणे जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र आदेशाचा भंग करून तो होळकरवाडी येथे फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
दि. १७/०२/२०२६ रोजी फुरसुंगी पोलिसांच्या पथकाने होळकर वाडी परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४८/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. डॉ. राजकुमार शिंदे (पोलीस उपायुक्त, परि-६, पुणे शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले (सहा. पोलीस आयुक्त), श्री. अमोल मोरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी) यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सागर वणवे, हरिदास कदम, श्रीनाथ जाधव, पोलीस अंमलदार हेमंत कामथे, अभिजीत टिळेकर आदी पथकाने केली.









