आमदार चेतन तुपे पाटील व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘श्री तुकाई माता भाजी मंडई’चे उद्घाटन!!


हडपसर:

कै. लतिश लक्ष्मण गवळी यांच्या स्मरणार्थ श्री तुकाई माता प्रतिष्ठान आणि श्री तुकाई माता भाजी मंडई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री तुकाई माता महिला भाजी मंडई’चा भव्य उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

हा सोहळा रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता तुकाई पोलीस चौकी शेजारी, तुकाई दर्शन रोड, काळेबोराटेनगर, हडपसर, पुणे २८ येथे पार पडणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी आमदार मा. श्री. चेतन (दादा) तुपे पाटील, नगरसेवक श्री. मारुती (आबा) तुपे, मा. महापौर व नगरसेविका सौ. वैशाली ताई बनकर, नगरसेविका सौ. उज्वलाताई जंगले आणि नगरसेवक श्री. नितीन (दादा) गावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या उपक्रमाचे आयोजन श्री तुकाई माता प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष श्री. योगेश (पप्पू) गवळी आणि श्री तुकाई माता भाजी मंडईचे अध्यक्ष श्री. निनाद (दादा) टिमगिरे यांनी प्रभाग क्र. १६ मधील आजी-माजी नगरसेवक व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सौजन्याने केले आहे.

स्थानिक महिलांच्या व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी ही भाजी मंडई अत्यंत उपयुक्त ठरणार असून, परिसरातील सर्व नागरिकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे


16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!