नागरिकांना वेळेत, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
याच उद्देशाने हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालय येथे आयोजित एकात्मिक आरोग्यविषयक समितीच्या बैठकीत सहभागी होत हडपसर विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. उपलब्ध यंत्रणा अधिक सक्षम करण्यासोबतच नागरिकांच्या गरजेनुसार नव्या उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
आरोग्यसेवा ही केवळ सुविधा नसून प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. हा हक्क अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू.
यावेळी विधानपरिषद आमदार योगेश आण्णा टिळेकर, प्रभाग समिती अध्यक्ष प्रशांत मामा तुपे, रंजनी नानी टिळेकर, सुरेखा ताई कवडे, हडपसर विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरसेवक-नगरसेविका तसेच सहाय्यक आयुक्त कुणाल धुमाळ, झोन ४ चे अधिकारी माळी साहेब, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक व आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे हे उपस्थित होते.









