पिसोळीत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; ग्राहकांसह चालकांवर गुन्हा दाखल!


पुणे:

पुणे शहर कार्यक्षेत्रात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेला काळेपडळ पोलिसांना मोठे यश आले आहे. पिसोळी परिसरातील एका फार्म हाऊसवर छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी धडक छापा टाकून तब्बल ७५,८०,७३९/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींसह हुक्का पिणाऱ्या ग्राहकांवरही गुन्हा दाखल केला आहे.

 

काळेपडळ पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार महादेव शिंदे आणि अतुल पंधरकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. पिसोळी येथील जगदंबा मार्गाजवळ, आंबिका हॉटेल रोडवरील एका फार्म हाऊसमध्ये अनिस सय्यद आणि त्याचा साथीदार साद सय्यद हे बेकायदेशीरपणे हुक्का विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

८ ते १० ग्राहक ताब्यात; वाहने आणि मोबाईल जप्त

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिसोळी फार्म हाऊसवर छापा टाकला. यावेळी ८ ते १० इसम तेथे अनाधिकृतपणे हुक्का पिताना रंगेहात आढळून आले. पोलिसांनी तातडीने या सर्वांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून:

०३ चारचाकी आणि ०२ दुचाकी वाहने

१२ मोबाईल संच

०८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेव्हर आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ७५ लाख ८० हजार ७३९ रुपये एवढी आहे.

 

याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गु.रजि.क्र. २९८/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) आणि सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ च्या कलम ४-अ, २१-अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.

 

सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त (पुणे शहर), जीवन बेनिवाल (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६), अतुलकुमार नवगिरे (सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग), आणि गिरीषा निंबाळकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) आण्णासो बाबर यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, उपनिरीक्षक रघुवीर खोडा तसेच अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, शाहीद शेख, निलेश देसाई, अमोल फडतरे, अतुल पंधरकर, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे, नंदकुमार जावळे, ज्ञानेश्वर कुलाळ, अक्षय जगताप, शुभम पवार आणि मेघराज जाधव यांच्या पथकाने ही प्रशंसनीय कामगिरी केली.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!