ससाणे नगर एमएसईबी कार्यालयाचा भोंगळ कारभार; अधिकारी गायब, सरकारी वीज दिवसभर फुकट!


“टेबल-खुर्च्याच खातात वारे”; नागरिकांचा संताप अनावर

Maharashtra State Electricity Distribution Company Limited च्या ससाणे नगर येथील कार्यालयात नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप समोर आला आहे. कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी जागेवर नसल्याने नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

विशेष म्हणजे कार्यालयात कुणी नसतानाही दिवसभर लाईट, पंखे आणि इतर विद्युत उपकरणे सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला सर्वसामान्य नागरिकांना वीज बचतीचे धडे दिले जात असताना सरकारी कार्यालयातच वीजेची उधळपट्टी होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते,

“कार्यालयात अधिकारी सापडत नाहीत, कामे रखडलेली असतात आणि फक्त टेबल-खुर्च्याच वारे खात बसलेल्या दिसतात.”

नागरिकांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी व निष्काळजी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!